पुणे : राज्यातील बारा जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला हरित लावादानं जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणा-या फ्लोरोसीस आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हरित लावादानं आदेश दिले होते त्या आदेशांचं पालन न केल्यानं हरित लवादानं हे आदेश दिले आहेत.
फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे आजारात वाढ झाली होती. याबाबत ॲड. असीम सरोदे यांनी २०१३ मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी हे आदेश देण्यात आले आहेत.
बोरच्या पाण्यात फ्लोराईड असतं. आजार होऊ नये म्हणून काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. मात्र, या जबाबदारीतून त्यांनी पळवाट काढली. न्याधिकरणाच्या आदेशाला गांभीर्याने न घेतल्याने त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नांदेड,चंद्रपूर,परभरणी,यवतमाळ,हिंगोली,वाशीम,जळगाव,जालना,लातूर,नागपूर,भंडारा या १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून हजर करा, तसेच १० हजार रूपयांचं जामीनपात्र वॉरंट हरित न्यायाधिकरणाच्या पुणे बेंचने काढले आहेत.