Navi Mumbai Local Train Video: नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मोबाइलवर बोलता बोलता एक मध्यम वयाचा व्यक्ती थेट रुळांवर उतरला. मात्र, त्याचवेळी समोरुन भरधाव वेगाने लोकल आली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. अंगावर काटा आणणारे हे दृश्य असून यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रवासी अनेकदा जीवावर उदार होऊन लोकल रुळ ओलांडतात. रेल्वे प्रशासनाकडून अनेकदा याबाबत घोषणा व प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, तरीही असे प्रकार सुरूच आहेत. तसंत हल्ली जगात असा एखादा व्यक्ती सापडेल जो मोबाईलचा वापर करत नसेल,बहुतांश नागरिक मोबाईलचा वापर करतात मात्र हाच मोबाईल अनेक घटनेत आपल्या जीवावर बेतला असल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. 14 जानेवारी म्हणजेच चार दिवसांपूर्वीची ही घटना आहे. एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असताना रेल्वे रुळांवर उतरते. तितक्यात समोरुन भरधाव ट्रेन येत होती. मात्र त्या व्यक्तीला ट्रेन येत असल्याचे समजलेच नाही. ट्रेन धडक देत पुढे निघून गेली. या घटनेत व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
VIRAL VIDEO : मोबाईलवर बोलता बोलता रुळांवर उतरला अन्...,
अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ #Zee24Taas pic.twitter.com/IqFU3EWZgt— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 17, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव व ओळख अद्याप कळू शकलेली नाहीये. मात्र त्याला एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे जायचे होते. मात्र समोरील मात्र समोरील पादचारी पुलाचा वापर करण्या ऐवजी त्याने मोबाईलवर बोलता बोलता उभ्या असलेल्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रूळ पार करून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच ट्रॅकवर येणारी रेल्वे त्याला समजली नाही. हा व्यक्ती मोबाईलमध्ये इतका मग्न झाला होता की शेवटी एका हाताने बोलत असलेला मोबाईल कानाला असताना लोकलने त्याला चिरडले.
लोकलचा अपघात इतका भीषण होता की त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले. या घटनेनंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या लोकांनी तात्काळ आरडाओरडा केली. व ही घटना रेल्वे अधिकारी गजेंद्र सिंग यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली मात्र तोपर्यंत त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले होते.