नवी मुंबईला पाणीपूरवठा करणारं मोरबे धरण पूर्ण भरलं

८८ मीटर इतकी मोरबे धरणाची खोली असून यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे हे धरण आता काटोकाठ भरलं आहे. 

Updated: Sep 2, 2017, 06:28 PM IST
नवी मुंबईला पाणीपूरवठा करणारं मोरबे धरण पूर्ण भरलं title=

नवी मुंबई  : नवी मुंबई शहराला पाणीपूरवठा करणारं मोरबे धरण पूर्ण भरलं आहे. दररोज ४५० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असणाऱ्या या धरणातून, नवी मुंबईला दररोज २५० एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. 

८८ मीटर इतकी मोरबे धरणाची खोली असून यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे हे धरण आता काटोकाठ भरलं आहे. 

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी धरणाची पाहणी करुन जलपूजन केलं. त्यानंतर त्यांनीच धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला. 

आता लवकरच जलवाहिनीचं काम करुन २४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलं.