प्रवीण दांडेकर, झी मीडिया, गोंदिया: लहान मुलांना कायमच आपण ओरडत असतो की त्यांनी व्हिडीओ गेम (why kids play video games) जास्त खेळू नयेत. मैदानी खेळ खेळणंच आरोग्यासाठी चांगलं असतं. परंतु सध्या असे मैदानी खेळ खेळणं मात्र एका चिमुरड्यासाठी महागात पडलं आहे. ही घटना ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. हा प्रकार ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवया राहणार नाही. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून यानं गोंदिया (Gondiya) जिल्ह्यात चिंतेचं वातावरण तयार केलं आहे. (navidaya vidyalaya student dies while playing football in gondia Maharashtra marathi news)
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील इयता सहावीच्या विद्यार्थांचा फ़ुटबाँल खेळतांना भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगम खिलेश्वर बोपचे वय 11 वर्षाच्या रा. सोनी, गोरेगाव, गोंदिया असे मृतकाचे नाव आहे. नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील संगम बोपचे (Student) हा विद्यार्थी विद्यालयाच्या मैदानावर मित्रांबरोबर फुटबॉल खेळत असताना अचानक त्याला भोवळ आल्याने तो मैदानातच (child dies heart attack) पडला त्याला लगेच विद्यालयाच्या शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगावबांध येथे नेले. तेथे तपासणी करून त्याला साकोली येथील हृदयरोग डॉक्टरकडे नेण्यात आले मात्र उपचार दरम्यान त्याचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगमच्या मृत्यू मुळे त्याच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
सध्या या परिस्थितीमुळे सगळीकडेच भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण (can child dies heart attack) झाले आहे. या प्रकारनं आता पुन्हा एकदा लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरले आहे. असे प्रकार हल्ली समाजात वाढताना दिसत आहेत.
बालकांत जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण वाढू लागलं आहे. दर हजार जन्मलेल्या बाळांमध्ये जन्मत: हृदयरोग असल्याचे प्रमाण 6 ते 12.3 टक्के जास्त आहे अशी माहिती समोर येते आहे. भारताच्या जन्मदराचा विचार केल्यास कन्जनायटल हार्ट डिसिज असणारी सुमारे 1.5 लाखाहून अधिक असल्यानं लहान लहान बालके दरवर्षी जन्मतात तेव्हा त्यांच्यात लहान मुलांत जे जन्मजात आजार आढळतात त्यात जन्मजात हृदयरोगाचा वरचा क्रमांक आहे. कधी कधी असे हृदयरोग जन्मजात आढळणा-या सिंड्रोमचा एक भागच बनतात.