लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत, कारण आमचे नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाले आहेत असं म्हटलं आहे. तसंच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं असून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे असं म्हटलं आहे. मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने काम केलं त्यानंतर मला यंदा जनतेनं का थांबवलं हे कळलं नाही राज्यात काम करायचं की कुठे हे अद्याप ठरवलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.
दिल्ली दौऱ्यासंबंधी विचारण्यात आलं असता नवनीत राणा म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींची शपथ होती, मी भाजपाची कार्यकर्ता आहे, त्यामुळे दिल्लीत जाण्यात काहीही गैर नाही. यापूर्वीदेखील पाच वर्ष दिल्लीत होती". पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत, कारण आमचे मोदी पंतप्रधान झाले आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. काही लोकं मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोकं दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात असं सांगत त्यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला.
दरम्यान यावेळी त्यांनी आपला पराभव का झाला हे समजलं नसल्याचंही म्हटलं. "मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने काम केलं त्यानंतर मला यंदा जनतेने का थांबवलं हे कळलं नाही. राज्यात काम करायचं की कुठे हे अद्याप ठरवलेलं नाही", असं त्या म्हणाल्या. तसंच आमच्या नेत्यांना अमरावतीत काय घडलं हे माहिती आहे. आम्ही त्यांना सांगायची गरज नाही असंही म्हणाल्या.
मोदी एकटे लढले, त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक लोकं झुंड बनवून त्यांना रोखत होते असं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अनुसूचित जाती-जमाती समाजातील लोकांना खोट्या स्वरूपात संविधान बदललं जाईल असं सांगत प्रचार केला. लवकरच त्यांना हा खोटा प्रचार होता याची जाणीव होईल असं त्यांनी सांगितलं. मुस्लीम आरक्षणावर बोलताना त्यांनी म्हटलं की, "अनुसूचित जाती-जमातीचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिले जाणार असेल, तर मी अनुसूचित जाती-जमाती समाजासोबात उभी राहीन".
यावेळी त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. "उद्धव ठाकरे यांचा पोपट बोलत होता की आम्ही शपथ घेऊ आणि मोदींना निमंत्रित करू. पण सर्वांनी पाहिलं नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. शेर आखिर शेर ही होता है", असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी मी पराभूत झाली असल्याने आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या.