मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नक्षलवादी कट रचत असल्याचा संशय आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ज्याप्रकारे हत्या घडवून आणण्यात आली त्याचप्रकारे मोदींचीही हत्या घडवून आणण्याच्या तयारीत माओवादी होते, असा खळबळजनक खुलासा एका पत्रातून झालाय. एल्गार परिषदेच्या आयोजनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोमा विल्सन हिच्या घरी हे खळबळजनक पत्र सापडलंय. रोमा विल्सन हिला दिल्लीतून अटक करण्यात आली होती.
ही माहिती सरकारी वकिलांनी पुणे न्यायालयात दिली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पाच माओवाद्यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. याच प्रकरणात न्यायालयात माहिती देताना सरकारी वकिलांनी हा धक्कादायक खुलासा केलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा माओवादी आणि नक्षली कारवायांत सहभागी आहे, असंही पुढे येतंय.
- मोदींनी १५ राज्यांत सरकार स्थापन केलंय
- हे असंच चालू राहिलं तर पार्टीला धोका आहे
- काही कॉमरेड नेत्यांनी एक प्रस्ताव दिलाय
- राजीव गांधींची हत्या झाली, त्याप्रमाणे कट आखण्याचा विचार आहे