"...अरे मग मैत्रीण कुठे बसणार?", अजित पवारांचा 'तो' प्रश्न ऐकताच उपस्थितांमध्ये पिकला हशा

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. नवी बाईक दाखवण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी विचारलेला प्रश्न ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2023, 05:21 PM IST
"...अरे मग मैत्रीण कुठे बसणार?", अजित पवारांचा 'तो' प्रश्न ऐकताच उपस्थितांमध्ये पिकला हशा title=

Ajit Pawar Viral Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या रोखठोक आणि मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. जाहीर कार्यक्रम, पत्रकार परिषदा यामध्ये अजित पवारांच्या स्वभावाची झलक दिसत असते. अजित पवार बोलताना कधीच हातचं राखून ठेवत नाही. त्यांच्या या स्वभावाचं इतर पक्षातील नेतेही नेहमी कौतुक करत असतात. दरम्यान पक्षाचा एक कार्यकर्ता अजित पवारांना त्याची नवी कोरी बाईक दाखवण्यासाठी आला असता त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

व्हिडीओत नेमकं काय? 

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आपली नवी बाईक अजित पवारांना दाखवण्यासाठी आला होता. अजित पवारांनीही या कार्यकर्त्याला नाराज केलं नाही. अजित पवार त्याची ही बाईक पाहायला आले. मात्र यावेळी बाईकला एकच सीट असल्याने अजित पवारांनी त्याला मैत्रिणीला कुठे बसवणार? अशी विचारणा केली. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

कार्यकर्ता आपली नवी जावा बुलेट घेऊन अजित पवारांना दाखवायला आला असता वारंवार तो त्यांना बसण्याचा आग्रह करत होता. यावर अजित पवारांनी मला काहीही करायला लावतो म्हणत बाईकवर बसणं टाळलं. त्यानंतर कार्यकर्त्याने अजित पवारांकडून बाईकला चावी लावून घेतली. यावेळी तो वारंवार त्यांना गाडीवर थोडा वेळ बसा आग्रह करत होता. फक्त बुलेटवर बसा, चालवू नका असं तो सांगत होता. पण अजित पवार काही बाईकवर बसले नाहीत. 

दरम्यान गाडी पाहिल्यानंतर अजित पवारांनी त्याच्याकडे किती हॉर्स पॉवर आहे, किंमत किती आहे अशी चौकशी केली. यावेळी त्यांनी रॉयल एनफिल्ड आणि या बाईकमधील फरकही समजून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कार्यकर्त्याने जावा बुलेट आहे सांगितल्यानंतर अजित पवारांनी पूर्वीची जावा कंपनी तीच आहे का? असं विचारलं. यानंतर अजित पवारांनी गाडीची सीट पाहिला असता एकच आहे असं आश्चर्याने म्हटलं. यावर कार्यकर्त्याने ‘हो एकच सीट आहे’, असं उत्तर दिलं. यानंतर अजित पवारांनी मैत्रिणीला न्यायचं असेल तर? असा प्रश्न विचारला. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.