राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन

पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे  निधन झाले आहे.  

Updated: Jul 4, 2020, 12:05 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन

पिंपरी-चिंचवड : येथील महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. भोसरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे निधन झाले. साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. 

कोरोनाच्या संकटात त्यांनी नागरिकांना मदत केली होती. तसेच लॉकडाऊनच्या काळात गरजुंना मदत करण्यासाठी आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दत्ता साने हे आघाडीवर होते. साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही भूषवले होते. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.  २५ जून रोजी साने यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्याचाही त्रास होत होता. गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आले नाही.

मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर देखील करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. येथील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. महापालिका कार्यालयातही करोनानं शिरकाव केला असून येथील ३० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.