राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'हल्लाबोल'चा समारोप, छगन भुजबळ काय बोलणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप आज पुण्यात होतोय.

Updated: Jun 10, 2018, 04:31 PM IST

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप आज पुण्यात होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवसही आजच आहे. त्यामुळे २० वा स्थापना दिवस तसेच हल्लाबोल आंदोलनाचा समारोप अशा दुहेरी औचित्यावर पक्षाचं शक्तीप्रदर्शन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची उपस्थिती या निमित्तानं लक्षवेधी ठरणार आहे. यावेळी ते काय बोलतात याबद्दल उत्सुकता आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून सुमारे एक लाख कार्यकर्ते त्यासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.