close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, रश्मी बागल शिवबंधन बांधणार

शिवसेनेचा राष्ट्रवादीला आणखी एक धक्का.

Updated: Aug 19, 2019, 01:24 PM IST
राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, रश्मी बागल शिवबंधन बांधणार

सोलापूर : करमाऴ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल, बंधू दिग्विजय बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी बारा वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. करमाळ्यात बागल गटाच्या मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे.

रश्मी बागल या माजी मंत्री दिवंगत दिंगबर बागल यांची कन्या आहे. याआधी दिग्विजय बागल यांनी एक पोस्ट करत म्हटलं होतं की, शिवबंधन हाती बांधण्याची वेळ आली आहे. याविषयीची सविस्तर चर्चा झाली असून शिवसेना आपल्याला तिकीट द्यायला तयार आहे.' त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलं होतं.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला शिवसेनेने आणखी एक धक्का दिला आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेमध्य जोरदार इनकमिंग सुरु आहे. विरोधकांचे मोठे नेते सत्तेत असलेल्या पक्षात सहभागी झाल्यामुळे विरोधकांपुढे मोठं आव्हान असणार आहे.