close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्याबाबत अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

 राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतल्या पाथरीतल्या सभेत ही घोषणा केली.

Updated: Aug 23, 2019, 09:32 PM IST
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्याबाबत अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

परभणी : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी यावेळची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. घड्याळ चिन्ह असलेल्या झेंड्यासोबत आता छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेला भगवा झेंडा देखील डौलानं फडणार आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतल्या पाथरीतल्या सभेत ही घोषणा केली.

आतापर्यंत शिवसेनेच्या सभांमध्ये भगवा झेंडा दिसायचा. मात्र आता राष्ट्रवादीच्या सभांमध्ये देखील भगवा झेंडा फडकताना दिसणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपानंही 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद... चला देऊ भाजपाला साथ' अशी घोषणा केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.