चंद्रकांत पाटील यांना मंत्री हसन मुश्रीफ यांचा जोरदार टोला

Hasan Mushrif on Chandrakant Patil : भाजपचे नेते प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Updated: Jan 14, 2022, 04:00 PM IST
चंद्रकांत पाटील यांना मंत्री हसन मुश्रीफ यांचा जोरदार टोला title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : Hasan Mushrif on Chandrakant Patil : भाजपचे नेते प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांना अनेक वर्षे मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. एसटी संपावर पवार यांनी तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या पोटात का दुखावे, असा सवाल केला आहे.

तसेच कोरोनाबाबतच्या वक्तव्यावरही टोला लगावला आहे. कोरोना हा रोगचं नसल्याचा चंद्रकांत पाटील यांचा समज आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, पण चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले, असे मुश्रीफ म्हणाले.

शरद पवार हे शडो मुख्यमंत्री आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. या टीकेला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, शरद पवार यांना अनेक वर्षे मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. एसटी संपावर पवार यांनी तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या पोटात का दुखावे? पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडी एकत्र आहे. ते भाजपला सहन होत नाही. आघाडी सरकार पाच वर्षे आपले काम करणार. कोणीही काही म्हणो आम्ही आमचे काम करीत राहणार आहोत.

प्रत्येक पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो, त्यामुळे राष्ट्रवादी देखील पक्ष वाढवत आहे. पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादी देशभरात प्रयत्न करत आहे. आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.