close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आमदारांच्या घोडेबाजारावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

आमच्या आमदारांचा शरद पवारांवर विश्वास 

Updated: Nov 8, 2019, 12:48 PM IST
आमदारांच्या घोडेबाजारावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

मुंबई : काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना २५ ते ५० कोटींपर्यंतची ऑफर दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे. आमच्या आमदारांना आमिष दाखवल्याची माहिती माझ्यापर्यंत नाही. आमचे नेते अजित पवार यांच्याकडे यासंदर्भात माहिती असू शकते. आमच्या आमदारांचा शरद पवारांवर विश्वास आहे. त्यामुळे ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आमदारांना दिले आहेत. त्यामुळे आमचे आमदार त्यांच्या मतदारसंघात आहेत. तसेच आमचे कोणतेही आमदार फुटणार नाहीत. विरोधी पक्षातील नेत्यांनाही संपर्क केला जातोय अशी माहिती काल जयंत पाटील यांनी दिली होती. 

२५ ते ५० कोटींची बोली

२५ ते ५० कोटींची बोली लावली जात आहे. शिवसेनेच्या आमदाराला ५० कोटींची ऑफर दिल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे. 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आमचे कोणतेही आमदार फुटून जाणार नाहीत. जर ते जयपूरला गेले असतील  फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. जर कोणाचे फोन आले तर ते रेकॉर्ड करा. आपण पुरावे गोळा करु आणि त्यांना तोंडावर पाडू असे आम्ही आमच्या आमदारांना सांगितले आहे.