close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांचा मेळावा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.

Updated: Sep 21, 2019, 01:19 PM IST
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांचा मेळावा

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. शरद पवारांचा अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याआधी पवारांचं स्वागत मोठी रॅली काढून करण्यात येणार आहे. या रॅलीची जोरदार तयारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलीय. शहरातील माळीवाडा इथल्या शिवाजी महाराज पुतळयापासून सुरू होणार आहे. 

 राष्ट्रवादीच्या यात्रेची समारोप सभा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा आज किल्ले रायगडावर समारोप होत आहे. महाड इथे राष्ट्रवादीच्या या यात्रेची समारोप सभा होणार आहे. सकाळी रायगडावर शिवछत्रपतींना अभिवादन करून त्यानंतर महाड इथे सभा होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार सुनील तटकरे, अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत.