नांदेड : भाजपचे नेते किरिटी सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) नेत्यांविरोधात आरोपांची मालिका सुरु केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते सोमय्या यांच्या निशाण्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी किरिट सोमय्या यांनी ठाकरे सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या उल्लेख 'घोटाळा इलेव्हन' (Scam Eleven) असा केला होता.
पण आता किरिट सोमय्या यांच्या आरोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (Nationalist Youth Congress) जशात तसं उत्तर द्यायंच ठरवलं आहे. किरीट सोमय्या यांनी अनेकांवर आरोप केले आहेत. पण जे नेते भाजपात सामील झाले त्यांच्याबाबत सोमय्या का बोलत नाहीत याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस 'जवाब दो मोहिम' सुरु करणार आहे. याअंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राज्यभरातून किरिट सोमय्या यांना 1 लाख पत्र पाठवण्यात येणार आहेत.
याची सुरुवात आज नांदेडमधून करण्यात आली. आता भाजपमध्ये असलेले कृपा शंकर सिंग, बबनराव पाचपुते, कैलाश अग्रवाल, विजय कुमार गावित यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचं काय झालं. याचं उत्तरं द्या अश्या आशयाचं पत्र सोमय्या यांना पाठवलं जाणार आहे .