राष्ट्रवादीला मोठा धक्का, यांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

Updated: Oct 2, 2019, 07:36 PM IST
राष्ट्रवादीला मोठा धक्का, यांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश title=

बुलडाणा : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित भोंगळ यांनी कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. बुलडाणा येथे आदिवासी समाजाची निर्धार परिषद आयोजित केली होती. भोंगळ यांच्या रूपाने जिल्ह्यातील वंचितची ताकद वाढली असून राष्ट्रवादी कोंग्रेसची ताकद यामुळे मात्र कमी झाली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वी जळगाव जामोद मतदार संघात वंचितकडून शरद बनकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र भोंगळ यांच्या वंचित प्रवेशाने जळगाव जामोद मतदार संघाचा उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे.