close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून शेजाऱ्यानेच केली महिलेची हत्या

रस्त्याच्या वादातून शेजा-यानेच केली हत्या

Updated: Jul 19, 2019, 06:56 PM IST
चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून शेजाऱ्यानेच केली महिलेची हत्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चाकणमध्ये एका ४२ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. कल्पना शितोळे असं या महिलेचं नाव असून रस्त्याच्या वादातून शेजा-यानेच हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शितोळे यांच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावरून त्यांचा शेजाऱ्यांशी वाद सुरू होता. या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. शेजाऱ्यानं कल्पना शितोळे यांच्या डोक्यात पाटा आणि कुकरचं झाकण मारून त्यांची हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.