पुतण्याचा Dirty Game; आंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढत काकीला केलं ब्लॅकमेल

Pune News : पुण्यातील (Pune) हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथं लेकासमान पुतण्याने आईसमान काकीसोबतच्या नात्याचा काळीमा फासला

Updated: Nov 18, 2022, 01:00 PM IST
पुतण्याचा Dirty Game; आंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढत काकीला केलं ब्लॅकमेल title=
Nephew blackmailed his aunt by taking obscene photos while taking a bath crime new pune

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: Pune News : पुण्यातील (Pune) हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथं लेकासमान पुतण्याने आईसमान काकीसोबतच्या नात्याचा काळीमा फासला. या विकृत पुतण्याने काकीचे आंघोळ करतानाचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत प्रेम संबंध ठेवण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर हे फोटो पती आणि जावयाला दाखवण्याची धमकी देत तिला वेळोवेळी बाहेर भेटण्यासही भाग पाडले. (Pune Crime News)

पुतण्याकडून वारंवार येणाऱ्या या धमकावण्याला कंटाळून महिलेने अखेर आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हाच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सदर प्रकरणी 40 वर्षीय महिलेकडून (काकी) तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर नात्यांची अवहेलना करणाऱ्या या 30 वर्षीय पुतण्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : पुण्यात चाललय काय? अज्ञाताने घरात घुसून महिलेला संपवलं

 

मोबाईलमध्ये फोटो काढले आणि...

अंदाजे चार वर्षांपूर्वी फिर्यादी या आंघोळ करत असताना आरोपीने त्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर हे फोटो फिर्यादीला दाखवून ब्लॅकमेल करून प्रेम संबंध ठेवण्यास भाग पाडले. चार वेळेस फिर्यादीला बाहेर भेटण्यासाठी बोलावले. तसेच ऐकले नाही तर हे फोटो पती आणि जावयाला दाखवून तुझी इज्जत घालवी अशी धमकी दिली. वारंवार होणाऱ्या त्याच्या या त्रासामुळे फिर्यादी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.