पुण्यात चाललय काय? अज्ञाताने घरात घुसून महिलेला संपवलं

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं असून सामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे

Updated: Nov 18, 2022, 12:16 PM IST
पुण्यात चाललय काय? अज्ञाताने घरात घुसून महिलेला संपवलं title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. शुल्लक कारणांवरुन होणाऱ्या भांडणांचे थेट हाणामारीत रुपांतर झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये हत्या घडल्याचेही समोर आलाय. त्यामुळे सामान्यांमध्ये घबराट पसरलीय. अशातच पुण्यात एका महिलेच्या घरात घुसून अज्ञाताने तिची हत्या केलीय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या कशामुळे झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पुण्याच्या राजगुरुनगर मधील शिवसाम्राज्य सोसायटीत राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेचा राहत्या घरात गळा आवळून खून केला. त्यानंतर ही आत्महत्या असल्याचा दाखवण्याचा प्रकार समोर आलाय. महिला एकटी असल्याचे पोहून अज्ञाताने घरात प्रवेश केला होता आणि त्यानंतर महिलेचा खून केला.

मात्र हा खून आत्महत्या दाखवण्यासाठी आरोपीने महिलेचा गळा आवळला. महिला घरात एकटी असताना अज्ञात व्यक्तीने घरात शिरुन गळा आवळून खून केला. त्यानंतर महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान महिलेच्या शवविच्छेदनात गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न समोर आले आहे.

दरम्यान, राजगुरुनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. मात्र महिलेचा खूण कोणी आणि का केला याबाबत अद्याप उलघडा झालेला नाही. राजगुरुनगर पोलीस याचा तपास करत आहे.