New Corona Variant | राज्य सरकारकडून नवी कठोर नियमावली जारी, नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली

कोरोना वाढू नये म्हणून सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे.

Updated: Nov 28, 2021, 03:56 PM IST
New Corona Variant | राज्य सरकारकडून नवी कठोर नियमावली जारी, नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली

मुंबई : कोरोना वाढू नये म्हणून सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. ज्याचे जनतेला पालन करावं लागेल. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच यापुढे टॅक्सी, रिक्षा, बस, एसटी अशा सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करता येणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तसंच कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे. ज्याचे पालन लोकांना करावे लागेल, नाहीतर तुमचे खुप मोठे नुकसान होऊ शकते.

सरकारच्या नियमानुसार मास्क न वापरणाऱ्यांना यापुढं 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीने वाहनामध्ये जरी मास्क घातला नसला तरी प्रवासी आणि चालकाला दोघांनाही 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे ग्राहकांनी बाजारात, दुकानात जरी एखाद्या व्यक्तीने मास्क लावला नसला तरी त्यांना 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तर मॉल मालकांना 50 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-न्यूझीलंड टेस्ट मॅचसाठी केवळ 25 टक्के प्रेक्षक उपस्थितीची अट घालण्यात आली आहे.

राजकीय सभा आणि कार्यक्रमांचं काय?

आरोग्य विभागाने या नियमावलीतून राजकीय पक्षांनाही सवलत दिलेली नाही. या राजकीय कार्यक्रमांनाही निर्बंध लादले आहेत. कार्यक्रम आणि सभांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यास आयोजकांवर 50 हजार रुपये दंड आकारला जाईल. इतकच नाही, तर कार्यक्रम सुरु ठेवायचा की तिथेच बंद करायचे आदेश द्यायचे याचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला असणार आहेत.