न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत बंपर भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

New India Assurance Job: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत असिस्टंट पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jan 30, 2024, 01:33 PM IST
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत बंपर भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज title=
New India Assurance Job

New India Assurance Job: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड बंपर भरती सुरु आहे. या अंतर्गत उमेदवारांना चांगला पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.एनआयएआरच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत असिस्टंट पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे.  तुम्ही ज्या राज्यासाठी/केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज कराल त्या संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना मराठी येणे आवश्यक आहे. 

पगार 

सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिना 37 हजार रुपये इतके वेतन दिले जाईल.

राज ठाकरेंनी आवाहन केलेली रेल्वे भरती नेमकी काय? कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

शेवटची तारीख 

सहाय्यक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांच्या सोयीसाठी बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2024 पासून याची अर्ज प्रक्रिया सुरु होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.  

Govt Job: दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जातील नियम आणि अटी वाचल्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद करण्यात येईल,याची उमेदवारांनी नोंद घ्या.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

रेल्वेत नोकरीची संधी 

दहावी उत्तीर्णांना रेल्वे भरतीअंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदासाठी अर्ज करता येणारआहे. या पदाच्या एकूण 5,696 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मराठी तरुणांनी या रिक्त पदांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारा दहावी उत्तीर्णसहित फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक आणि समकक्ष आयटीआय उत्तीर्ण असावेत. यासोबतच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल इंजिनिअरींग डिप्लोमाधारकांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 19 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.