चंद्रशेखर भुयार झी मीडिया बदलापूर : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट हे तर नेहमीचंच झालंय.. त्यामुळे प्रत्येक जण वेगळ्या आनंदाचा शोध घेऊ पहातोय.. अर्थातच हा आनंद त्याला निसर्गाच्या जवळ आणतो.. आणि नेमका हाच मध्यबिंदू साधत मुंबईजवळची कृषीपर्यंटनस्थळं नववर्षाच्या स्वागतासाठी सजू लागलीत..
निसर्गाच्या सानिध्यात, झाडांच्या गर्दीत आणि नदीकिनारी दडलेली ही कृषीपर्यटन केंद्र आता ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सजू लागलीत.. हॉटेल्स आणि रिसॉर्टचा तोच तो पणा आता सगळ्यांनाच नकोसा झालाय.. त्यामुळे नवा पर्याय म्हणून पर्यटक या कृषी पर्यटन केंद्राकडे वळू लागलीत.. इथली टुमदार घरं.. सुंदर बगिचे.. चुलीवरचा स्वयंपाक सगळ्यांनाच भुरळ घालतोय.. कर्जत, बदलापूर, शहापूर, अंबरनाथ इथली कृषी पर्यटन केंद्र इथं येणा-या पर्यटकांच्या स्वागतासाठी साठी सज्ज झालीत..
बच्चे कंपनी देखील इथल्या सुंदर बगीचांमध्ये मनसोक्त बागडतात.. मनसोक्त खेळतात.. याशीवाय अनेक ठिकाणी रेन डान्स स्विमिंग पूलसारखे पर्यायही आहेत.. रहाण्या-खाण्याची उत्तम सोय इथं होते तीही प्रतीमाणशी 800 ते 1500 रुपयांमध्ये..
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराघरात प्लानिंग सुरु आहेत.. पैसा आणि वेळेच्या गणितावर प्रत्येक प्लान जुळवला जातोय.. अशात स्वस्त आणि मस्त असणारा हा कृषीपर्यटनाचा नवा फंडा अनेकांच्या पसंतीस उतरतोय..