शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सकडून नवी नियमावली सादर

पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Updated: Sep 6, 2021, 10:04 AM IST
शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सकडून नवी नियमावली सादर  title=

मुंबई : शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीची नवी नियमावली सादर करण्यात आली. बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सने यात अनेक नवे बदल सुचवले आहेत.  शाळांचे दिवस, शाळांमधले तास, मधली सुट्टी यात गर्दी टाळण्यासाठी आवश्यक बदल सुचवण्यात आलेत. तसंच शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक उभारण्याचीही सूचना करण्यात आलीय. शाळा सुरू करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली आहे. मुलांना कायम घरात ठेवता येणार नाही असं टास्कफोर्सने म्हटलं आहे. 

विदयार्थी घरी राहिल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर भरपूर परिणाम होत आहे. तसेच मोबाइलचा वापर वाढल्यामुळे इतर समस्या देखील खूणावत आहेत. तसेच मुलांचं घराबाहेर पडणं बंद झाल्यामुळे त्यांना मानसिक आजारांना सामोरं जावं लागत आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्यात तणावाच वातावरण पाहायला मिळत आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढत असल्याचं सर्वेशणात दिसून आलं आहे. 

काय आहेत नियमावली पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून