ठाणे : मोतीबिंदूमध्ये डोळ्यांच्या बुबुळावर एक पडदा तयार होतो. तसेच बुबुळाच्या आतमध्ये मोतीबिंदू पिकू लागतो. सध्या तरी डोळ्यांचे डॉक्टर मोतीबिंदू दोष घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. मात्र ती हाताने केली जाते.
आता रोबोटीक ब्लेड फ्री लेझरने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. ज्यात माणसाचा वापर शस्त्रक्रियेसाठी केला जात नाही. संगणकाच्या सहाय्याने डोळ्यांचे स्कॅनिंग करून लेझरचा वापर करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते ते देखील रूग्णाला २० सेकंदात मोकळे केले जाते.
मानवी मेंदू आणि हात वापरून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायला साधारण १० मिनिटे तरी लागतात. मात्र कितीही काळजी घेतली तरी. छोटीशी मानवी चूक माणसाला फारमोठी किंमत मोजायला लावू शकते. मात्र नवीन रोबोटीक ब्लेड फ्री लेझरने अचूकता १०० टक्के येते. तसेच प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत कोणताही धोका देखील नसतो.