उमेश परब, झी २४ तास, सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील 'अधिश' बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारीवरून मुंबई महानगर पालिकेने राणेँना नोटीस पाठवली आहे.
त्यापाठोपाठ महापालिकेचे अधिकाऱ्यांनी 'अधिश' बंगल्याची पाहणी केली. तसेच, तक्रारीच्या अनुषंगाने बंगल्याचे मोजमापी केली. त्यानंतर राणे कुटुंबियांकडून पहिलीच प्रतिक्रीया समोर आली आहे.
महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने हे सर्व पाहतेय. राणे कुटुंबीय असो, किरीट सोमय्या असो की देवेंद्र फडणवीस... जे जे या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय.
खुल्या मैदानात ते आमच्याशी लढू शकत नाहीत. त्यांना ज्या ज्या प्रकारे लढायचं आहे ते येऊ दे अंगावर आम्ही घाबरत नाही. पालिकेच्या नोटीसीला मात्र कायदेशीर उत्तर देणार आहोत. मैदानात हरायचं आणि शेंबड्या मुलासारखं लढायचं याला काही अर्थ नाही, अशी टीका नितेश राणे यांनी सरकारवर केलीय.