संघाचे माझ्यावर संस्कार, जातीयवादाला थारा नाही - नितिन गडकरी

वात्रटिकाकार रामदास फुटाने आणि रेणुका देशकर यांनी गडकरींची मुलाखत घेतली. 

Updated: Jan 1, 2018, 08:16 PM IST
संघाचे माझ्यावर संस्कार, जातीयवादाला थारा नाही - नितिन गडकरी  title=

पुणे :  संघ आणि विद्यार्थी परिषदेचे माझ्यावर संस्कार आहेत. तुम्ही जो संघ समजता तो संघ नाहीच आहे, असे वक्तव्य परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी केले आहे. रिॲलिटी वर्सेस इमेज ही संघाची ट्रॅजिडी आहे 

जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित करण्यात येणार्या १५ जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन आज गडकरींच्याहस्ते पुण्यात झालं. त्यावेळी ते बोलत होते. वात्रटिकाकार रामदास फुटाने आणि रेणुका देशकर यांनी गडकरींची मुलाखत घेतली. 

जातीयवाद नाही 

 मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी लपवत नाही. जो जातीयवाद करतो त्याला माझ्याकडे स्थान नाही.

 मी जात मानत नाही, मी ब्राह्मण असलो तरी सर्व बहुजन समाज माझ्या पाठीशी आहे. 

कामात हस्तक्षेप नाही 

माझा राजकीय वारसा कुटुंबीयांमध्ये नाही. माझी मुलं, बायको राजकारणात नाहीत, त्यांच्यासाठी कधी तिकीट मागणार नाही.

कुटुंबियांनी त्यांची क्षेत्रं निवडली आहेत. आम्ही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही.

लोकांना फक्त तिकीट पाहीजे

 राजकारणात १०० टक्के आदर्शवाद शक्य नाही. लोकांना फक्त तिकीट पाहीजे. सामाजिक काम करायला नको असे यावेळी गडकरी यांनी सांगितले.