उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यासाठी गडकरींनी घेतला रुद्रावतार

नितीन गडकरींनी प्रशासनाला भरला दम

Updated: Dec 23, 2018, 02:47 PM IST
उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यासाठी गडकरींनी घेतला रुद्रावतार

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील बहुचर्चित उड्डाणपुलाचं काम अखेर सुरू होणार आहे. काम सुरू करण्यासाठी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कालच वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रुद्रावतार घ्यावा लागला. खुद्द नितीन गडकरी यांनीच पुण्यात ही माहिती दिली आहे. गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं भूमीपूजन होऊन एक वर्ष उलटलं. तरी देखील काम काही सुरू झालेलं नाही. त्यावर गडकरींनी प्रशासनाला दमच भरत, मी पुण्यात येईपंर्यत वर्क ऑर्डर देण्याचे आदेश दिले. त्यानंतर शनिवारी दुपारी कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जंयती निमित्त रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.