Nitin Gadkari Net Worth: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर पुन्हा एकदा भाजपने विश्वास दाखवत नागपुरातून उमेदवारी दिली आहे. तिकिट मिळाल्यानंतर आज बुधवारी गडकरींनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी नागपुरात भव्य रोड शोचेदेखील आयोजन केले होते. गडकरी यांच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन गडकरी यांचे वय 66 वर्षे आहे. त्यांच्या कामामुळं त्यांना 'इन्फ्रास्ट्रक्चर मॅन' म्हणूनही ओळखले जाते. देशातील मोठ-मोठे महामार्ग बांधण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ते कामदेखील करत आहेत.
2014 साली भाजप सत्तेत आल्यानंतर नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले. आपल्या कामामुळं नितीन गडकरी यांच्यावर विरोधी पक्षाकडूनही कधी टीका होत नाही. विरोधी पक्षाचे नेतेही त्यांचे कौतुक करतात. नितीन गडकरी यांच्याकडे आजच्या घडीला चल-अचल अशी एकूण किती संपत्ती आहे. याबाबत जाणून घेऊया.
2019 लोकसभा निवडणुकीच्यावेळी जाहिर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांच्याकडे एकूण 69,38,691 रुपयांची चल संपत्ती आहे. तर, त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्याकडे 91,99,160 रुपयांची चल संपत्ती आहे. नितीन गडकरी यांच्या बँक अकाउंटमध्ये 8,99,111 रुपये आणि त्यांची पत्नी कांचन यांच्या बँक खात्यात 11,07,909 रुपये आहेत. तर, नितीन गडकरी यांच्यानावावर बँकेचे कर्ज 1,57,21,753 इतके आहे. तर, त्यांच्याकडे एकूण 6 कार असून त्यातील 4 कार त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत.
नितीन गडकरी यांच्याकडे 6,95,98,325 इतकी अचल संपत्ती आहे. तर, त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्याकडे 6,48,60,325 रुपयांची अचल संपत्ती आहे. नितीन गडकरी यांच्याकडे नागपुरच्या धपेवाडामध्ये 29 एकर इतकी जमीन आहे. तर, त्यांची पत्नी कांचन यांच्यानावे 15 एकर इतकी जमीन आहे. तर, मुंबईतील वरळी येथील एमएलए सोसायटीत एक फ्लॅट आहे. नितीन गडकरी यांच्याकडे नागपुरातील महाल येथे वडिलोपार्जित घर आहे.
नितिन गडकरी यांच्या इनकम सोर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे बिझनेस, शेती आणि पगार येथून उत्पन्न येते. तर, अन्य स्त्रोत मिळून वर्षाला 12 कोटी रुपयांची कमाई होते. नितीन गडकरी यांचा शेती हा व्यवसायदेखील आहे. नितीन गडकरी यांनी एकदा म्हटलं होतं की, त्यांना या व्यवसायातून 12 ते 15 कोटींचा नफा मिळतो.
BRN
102(19.4 ov)
|
VS |
RWA
41/1(8.4 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.