कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; नारायण राणे यांचा दावा

कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा नारायण राणेंनी केला,  कुणबी आणि मराठे वेगळे असेही ते म्हणाले. जरांगेंनी जातीचा अभ्यास करावा असा खोचक सल्ला देखील राणेंनी जरांगेंना दिला आहे.

Updated: Oct 19, 2023, 06:28 PM IST
कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; नारायण राणे यांचा दावा title=

Narayan Rane on Maratha Reservation :  मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज-जरांगे पाटलांनी कंबर कसलेली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय.

कुठल्याही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र नकोय. ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असा दावाही नारायण राणेंनी केलाय. मनोज जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा असा सल्लाही नारायण राणेंनी जरांगेंना दिला आहे.

मनोज जरांगेंना पुढचे मुख्यमंत्री करू असा सकल मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार

प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवून मनोज जरांगेंना पुढचे मुख्यमंत्री करू असा निर्धार सकल मराठा क्रांती मोर्चानं केलाय. आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. मनोज जरांगे-पाटलांचे वादळ आता पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकणार असून या वादळाचे धक्के प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलाय. 

मराठा आंदोलनामुळे आमच्या पक्षाला कोणताही धोका नाही

मराठा आंदोलनामुळे आमच्या पक्षाला कोणताही धोका नाही. मराठा आरक्षण उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीनं घालवलं अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची इच्छा आहे असंही बावनकुळेंनी म्हंटलंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे सरकारची धावाधाव सुरू असल्याचं बोललं जातंय. 

सुनील कवळेंच्या आत्महत्येनंतर मराठा नेते आक्रमक 

सुनील कवळेंच्या आत्महत्येनंतर मराठा नेते आक्रमक झालेत. सरकारमुळेच बळी जातायत, असा आरोप जरांगेंनी केलाय. तर आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसेल तर परिणाम तीव्र होतील असा इशारा विनोद पाटलांनी सरकारला दिलाय.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुनील कावळे यांच्या घरी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी भेट दिली आणि कुटुंबाचे सात्वन केलं..सुनील कावळे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी आठ वाजता संभाजीनगरमधल्या मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

मनोज जरांगेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ  पवार काका-पुतण्यांनाही बसणार

मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता पवार काका-पुतण्यांनाही बसणार आहे. मराठा समाजानं राजकीय नेत्यांना गावागावात प्रवेशबंदी केलीय.. त्याचा फटका शरद पवार आणि अजित पवार यांनाही बसणाराय... येत्या 23 ऑक्टोबरला बबनदादा शिंदेंच्या पिंपळनेर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार सोलापुरात येणार आहेत. तर त्याचदिवशी माढामध्ये शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतक-यांची बैठक घेणार आहेत. मात्र पवार असोत नाहीतर इतर, एकाही नेत्याला सोलापुरात येऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय.. तर अजित पवार चले जावच्या घोषणा सकल मराठा समाजानं दिल्या आहेत.