टिळकांनी नाही तर यांनी बांधली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, पाहा छगन भुजबळ काय म्हणतात?

Chhagan Bhujbal On Raj Thackeray : लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधलेली नाही. टिळक यांनी जमा केलेला निधी बँकेतच बुडाला. टिळक दोन वेळेस गेले पण त्यांना समाधी सापडली नाही. इतिहासकारांचे दाखले देत भुजबळांने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

Updated: May 2, 2022, 01:47 PM IST
टिळकांनी नाही तर यांनी बांधली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, पाहा छगन भुजबळ काय म्हणतात? title=

नाशिक : Chhagan Bhujbal On Raj Thackeray : लोकमान्य टिळक यांनी नव्हे तर शंभू महाराज यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधली आहे. टिळक यांनी जमा केलेला निधी बँकेतच बुडाला. टिळक दोन वेळेस गेले पण त्यांना समाधी सापडली नाही. इतिहासकारांचे दाखले देत भुजबळांने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

पुरंदरे रामदास स्वामी आणि टिळक यांचे गुणगान गायचे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जातीयवादी ठरवायचे यासाठी सभा होती की काय ? छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. शाहू महाराज फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काहीच का बोलत नाहीत. हा द्वेष वाढविण्याचा प्रकार आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरुन पडले तर त्यांच्यावर शस्त्रक्रिया डॉ. मुजावर यांनी केली, असे भुजबळ म्हणाले.

टिळक यांनी समाधी बांधली हे धंदान्त खोटे आहे. इंग्रजाच्या इतिहासानुसार समाधी शंभू महाराजानी बांधली आहे. तसेच पेशव्यांनी सुद्धा या समाधीकडे दुर्लक्ष केले, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. महात्मा फुले यांनी समाधी शोधली त्याची साफ सफाई केली आहे. शिवजयंती सुद्धा पहिल्यांदा साजरी केली. टिळक यांनी समाधीसाठी निधी जमा केला. शाहू महाराजांनी निधी दिला. मात्र, ज्या बँकेत निधी होता तो बुडाला असे उत्तर टिळकांनी इंग्रजांना दिल आहे, असा इतिहास आहे, असे भुजबळ म्हणाले.

अखेर इंग्रजानी समाधीवरील छत्री बांधली हा इतिहास आहे. इथेसुद्धा फुले शाहू आंबेडकरांना बाजूला सुरु नका. टिळक दोन वेळेस गेले त्यावेळी त्यांना समाधी सापडली नाही उलट नानासाहेब पेशव्यांची समाधीची पूजा केली. इंद्रजित सावंत या इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे, पवार यांनी अनेकवेळा छत्रपतींचे नाव घेतले आहे. छत्रपती राज्याभिषेक करताना ब्राम्हणाना अडचण आली. ब्राम्हणांचा विरोध कुणीच केला नाही महाराजानी सुद्धा केला नाही. महाराजांनी मंदिर बांधले आणि मशीदही बांधली, असे भुजबळ म्हणाले.

इंद्रजित सावंत यांनी पत्र आणलं समोर

टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसाठी एक विटही रचली नसल्याचे इतिहासात अभ्यासक इंद्रजित सावंत (History Research & Analysis particularly Indrajit Sawant ) यांनी सांगितले. जो नेता आपल्या शेंड्यावर शिवाजी महाराज यांची राजमुद्रा व्यवस्थित छापत नाही, त्याकडून काय अपेक्षा करायची, असा सवाल देखील इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला आहे.

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारात लोकमान्य टिळकांचे योगदान नाही, असा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे. समाधी जीर्णोद्धारासाठी टिळकांनी फक्त पैसे जमा केले. जीर्णोद्धारासाठी टिळकांनी शाहू महाराजांना ही पत्रव्यवहार केला होता. याबाबतचे पत्र इंद्रजित सावंत यांनी समोर आणले.