'रस्त्याची चुकीची कामं करणाऱ्या कंत्राटदाराला भर चौकात शिक्षा द्यायला हवी'

रस्त्यांची चुकीची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना भर चौकात शिक्षा द्यायला हवी, वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे नंबर छापायला

Updated: Jan 17, 2020, 06:45 PM IST

नागपूर : रस्त्यांची चुकीची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना भर चौकात शिक्षा द्यायला हवी, वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे नंबर छापायला हवेत, असं म्हटलंय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी....रस्ता सुरक्षाविषयक कार्यक्रमात ते बोलत होते. चुकीची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना गडकरींनी अशाप्रकारे इशाराच दिला आहे. 

जेवढे लोक दहशतवादी हल्ल्यात मरत नाहीत, त्यापेक्षा जास्त लोक रस्ते अपघातात मरतात. दर वर्षी रस्ते अपघातात भारतात दीड लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.