आता औषधाचे पूर्ण पाकीट घेण्याची सक्ती नाही : एफडीए

आतापर्यंत आपण गरज नसताना देखील औषधांचे संपूर्ण पाकीट विकत घेत होतो. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 22, 2017, 12:51 PM IST
आता औषधाचे पूर्ण पाकीट घेण्याची सक्ती नाही : एफडीए title=

मुंबई : आतापर्यंत आपण गरज नसताना देखील औषधांचे संपूर्ण पाकीट विकत घेत होतो. मात्र आता औषधांचे संपूर्ण पाकीट विकत घेण्याची गरज नाही.

कारण लवकरच ही सोय उपलब्ध...

कारण लवकरच रुग्णांना गरजेनुसार ओषध खरेदी करता येणार आहेत. याविषयी नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्यांना निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर नुकतेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियालाही एफडीएने पत्र लिहुन औषधांची छोटी पाकिटे तयार करण्याविषयी सांगितले आहे. 

या निणर्याचे फायदे काय?

अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्णयामुळे औषधांचा अपव्यय टाळला जाईल व दुष्परिणामांना आळा बसेल, असे ऑल केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सांगितले.

का घेतला हा निर्णय?

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त अर्जुन खडतरे म्हणाले की, अनेकदा रुग्णांना औषधाची कमी मात्रा लागते. परंतु, औषध विक्रेत्यांना औषधांच्या स्ट्रिप्स कापणे शक्य नसते. कारण त्यामुळे औषधांच्या स्ट्रिप्स वरील महत्त्वाची माहिती म्हणजेच तारीख, बॅच क्रमांक, एक्स्पायरी डेट कापले जाण्याची शक्यता असते आणि ती नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला संपूर्ण माहिती असलेली औषधांची छोटी पाकिटे बनविण्याविषयी पत्र लिहुन सुचित केले आहे.