तुम्हीही होऊ शकता विशेष पोलीस अधिकारी!

औरंगाबाद पोलिसांच्या ताफ्यात आज एक हजार अधिका-यांचा नव्यानं समावेश होणारेय. मात्र हे अधिकारी पोलिसांतील नाहीत तर हे आहेत सर्वसामान्य नागरिक... कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी विद्यार्थी, कुणी वकील तर कुणी गृहिणी... तुम्हाला प्रश्न पडवा असेल की हे सगळे पोलीस अधिकारी कसे झालेत... त्यासाठी पाहूयात औरंगाबादहून स्पेशल रिपोर्ट...

Updated: Sep 4, 2017, 07:40 PM IST
तुम्हीही होऊ शकता विशेष पोलीस अधिकारी! title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद पोलिसांच्या ताफ्यात आज एक हजार अधिका-यांचा नव्यानं समावेश होणारेय. मात्र हे अधिकारी पोलिसांतील नाहीत तर हे आहेत सर्वसामान्य नागरिक... कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी विद्यार्थी, कुणी वकील तर कुणी गृहिणी... तुम्हाला प्रश्न पडवा असेल की हे सगळे पोलीस अधिकारी कसे झालेत... त्यासाठी पाहूयात औरंगाबादहून स्पेशल रिपोर्ट...

औरंगाबादच्या पोलीस मैदानावर सर्वसामान्य नागरिकांचं पोलीस प्रशिक्षण सुरू आहे. कारण गणपती विसर्जनच्या दिवसापासून हे सगळे नागरिक औरंगाबाद पोलिसांत विशेष पोलिस अधिकारी म्हणून दाखल होतायत. होय पोलिसांच्या नियमानुसार सामान्य नागरिकांनाही विशेष पोलीस अधिकारी म्हणून पोलिसांत दाखल केले जाऊ शकतात. आणि याच नियमाचा आधार घेत औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी हा उपक्रम सुरु केलाय. 

हे सर्व सामान्य नागरिक विशेष पोलीस अधिकारी म्हणून सर्वसामान्य पोलिसांसारखे काम करू शकणारेत. अगदी कडक चाचणीतून या सगळ्यांची निवड करण्यात आय. त्यांच्या आयुष्यातून आठवड्याचे 12 तास त्यांना फक्त पोलिसांच्या कामासाठी द्यायचेत. हे सर्व अधिकारी एक खास पोलीस जॅकेट घालून पोलिसांसोबत कर्तव्य बजावतील. 

अगदी लोकांमध्ये मिसळून पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचं कामही हे विशेष पोलीस अधिकारी करतील आणि सर्वसामान्यांची भावनाही पोलिसांपर्यंत पोहोचवतील. सध्या एक हजार लोकांची यासाठी निवड करण्यात आलीय. मात्र येणा-या काळात हा आकडा १० हजारावर न्यायचा विश्वास औरंगाबाद पोलिसांनी व्यक्त केलाय. 

जी लोक या उपक्रमात सहभागी झालीयत त्यांनीही आनंद व्यक्त केलाय. हाती एक वेगळा युनिफॉर्म आणि दंडा आला असला तरी समाजासाठी काही तरी करता येईल याचा आनंद त्यांच्या चेह-यावर आहे.

सर्वसामान्यांना पोलिसांच्या कामात समावेश करून घेणं निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. यामुळं नागरिक आणि पोलिसांमधील दुरावा कमी होण्यास निश्चितच मदतही होईल मात्र असं असलं तरी हे सगळं नियंत्रित ठेवणं हे सुद्दा मोठं आव्हान पोलिसांसमोर असणारेय. मात्र सध्या तरी गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलिसांचं एक पाऊल नागरिकांसाठी पुढं पडतंय हेही नसे थोडके...