ओखी चक्रीवादळ: सागर किनाऱ्यांवर 3 नंबर बावटा लावण्याचे आदेश

वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बंदर विभागाने ३ नंबरच्या बावट्याचे आदेश दिले आहेत.

Updated: Dec 5, 2017, 10:00 AM IST
ओखी चक्रीवादळ: सागर किनाऱ्यांवर 3 नंबर बावटा लावण्याचे आदेश title=

सिंधुदुर्ग : ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या सागर किना-यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण बंदरातही ३ नंबरचा बावटा लावण्याचे आदेश बंदर विभागाने दिले आहेत.

विशेष म्हणजे या ठिकाणी रविवारपर्यंत २ नंबरचा बावटा लावण्यात आला होता. मात्र आता वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बंदर विभागाने ३ नंबरच्या बावट्याचे आदेश दिले आहेत. ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने इथे वारे वाहत असून, येत्या काही तासांत वा-याचा वेग वाढून तासाला ६० ते ७० किलोमीटर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.