close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खाद्य तेलाच्या टँकरला अपघात, तेलासाठी लोकांची झुंबड

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात खाद्य तेलाच्या टँकरचा अपघातानंतर तेलासाठी लोकांची झुंबड उडाली.

Updated: Aug 19, 2019, 03:23 PM IST
खाद्य तेलाच्या टँकरला अपघात, तेलासाठी लोकांची झुंबड

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात खाद्य तेलाच्या टँकरचा अपघातानंतर तेलासाठी लोकांची झुंबड उडाली. नागभीड - नागपूर मार्गावरील मोहाडीजवळ सकाळी खाद्य तेलाचा टॅंकर अपघातग्रस्त झाला. रस्त्यावर वाहून जाणारे तेल एकत्र करण्यासाठी ग्रामस्थांनी धडपड केली. खाद्य तेल मिळविण्यासाठी मिळेल ती साधने भांडे प्लास्टीक डबे घेवून स्थानिक घटनास्थळी पोचले. 

टँकरचा अपघात कशामुळे झाला याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. पण तेल मिळवण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.