खळबळ! गणेश मंडळाची रेकी केल्याचा संशयातून नाशिकमध्ये एक संशयित ताब्यात

Nashik News: नाशिकमध्ये दहशतवादी कारवायाच्या संशयावरून एकाची चौकशी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मनमाडमध्ये गणेश मंडळाची रेकी केल्याचा संशयातून इंटेलिजन्स ब्युरो व एटीएसने कारवाई केली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 20, 2023, 09:39 AM IST
खळबळ! गणेश मंडळाची रेकी केल्याचा संशयातून नाशिकमध्ये एक संशयित ताब्यात title=
One person is being questioned on suspicion of terrorist activities in nashik manmad

निर्भय वाघ, झी मीडिया

Nashik News: महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या मनमाडमध्ये घातपाताचा कट उधळून लावला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरो व एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) एकाला ताब्यात घेत चौकशी करून सुटका केल्याने खळबळ उडाली आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, एटीएसने ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीने मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रकरण करुन रेकी केल्याचा त्याच्यावर संशय असून मंडळाचे चित्रीकरण करुन संशयित अजिंठा एक्सप्रेसने जात असतना नगरसूल स्थानकातून रेल्वे सुरक्षा बलाचा मदतीने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएस आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. 

एटीएसने पहाटेपर्यंत संशयिताची कसून चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयित यापूर्वीही गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर असल्याचे समजते. याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आली नाहीये. मात्र, या घटनेने एकच खळबळ समोर आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात गणेशजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मुंबई, पुणेसह नाशिक, नागपूर येथेही सार्वजनिक मंडळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या जातात. गर्दीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, सार्वजनिक ठिकाणीही पोलिस गस्त घालत असतात. 

लालबागच्या राजाला गर्दी

लालबागच्या राजाला गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. गणेश भक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लालबाग गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते  प्रयत्न करत आहे. तर मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांची गर्दी होत असते. तसेच दर्शनासाठी देश विदेशातून भाविक आणि व्हीआयपी येत असतात.