'यंदा सरासरीच्या केवळ ९३ टक्के पाऊस'

स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या केवळ ९३ टक्के पाऊस होऊ शकतो. 

Updated: Apr 3, 2019, 07:11 PM IST
'यंदा सरासरीच्या केवळ ९३ टक्के पाऊस' title=

मुंबई :  यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यां समोर पुन्हा एकदा पीक लागवडीचा प्रश्न उपस्थित राहणार आहे. यावर्षी तुलनेत कमी पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेनं वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या केवळ ९३ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज स्तायमेटने वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ५५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही बळीराजापुढे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. 

Image result for rain zee news

स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या केवळ ९३ टक्के पाऊस होऊ शकतो. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ५५ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांसमोर याचा मोठा प्रश्न उपस्थित राहणार आहे. जुनमध्ये 77 टक्के, जुलैमध्ये 91 टक्के, ऑगस्टमध्ये 102 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 99 टक्के पाऊस होईल असा अंदाज देखील स्कायमेटने वर्तवला आहे.