close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

स्मार्ट सिटीच्या कामांना नाशिकमध्ये विरोध

स्मार्ट सिटी कंपनी बरखास्त करण्याची मागणी

Updated: Feb 5, 2019, 06:00 PM IST
स्मार्ट सिटीच्या कामांना नाशिकमध्ये विरोध

किरण ताजणे, नाशिक : भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना नाशिकमध्ये विरोध होऊ लागला आहे. स्मार्ट सिटी कंपनी बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर काही भाजप पदाधिकारी देखील स्मार्ट सिटीला कडाडून विरोध करू लागल्यानं पंतप्रधानांच्या संकल्पनेला हरताळ फासला जातो आहे. 

नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकासकामं पार पडली आहेत. कालिदास कला मंदिराचं रुपडं अगदी आधुनिक झालं आहे. त्याशिवाय नेहरू उद्यान, महात्मा फुले कलादालन ह्या वास्तु देखील पूर्ण झाल्या असून स्मार्ट रोड आणि सायकल ट्रॅकची कामं सुरू आहेत. स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावर अवलंबून आहे. शिवाय त्यात महापालिकेचा हिस्सा देखील आहे. मात्र या स्मार्ट सिटीच्या कामांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यामुळं स्मार्ट सिटी प्रकल्पाला विरोध केला जातो आहे.

स्मार्ट सिटीच्या अधिकच्या कामांमुळं कर्ज काढण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी सूचक मौन बाळगलं आहे. तर कर्जासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

आधी तुकाराम मुंढे विरुद्ध महापालिका असा संघर्ष होता. आता महापलिका विरुद्ध स्मार्ट सिटी कंपनी असा संघर्ष सुरू झाला आहे. विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाचे पदाधिकारी स्मार्ट सिटीला विरोध करतायत की काय, अशी चर्चाही यानिमित्तानं रंगली आहे.