व्हिडिओ : रस्त्याचा अंदाज न आल्यानं पुराच्या पाण्यात गाई वाहून गेल्या...

पालघर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय

Updated: Aug 3, 2019, 07:32 PM IST
व्हिडिओ : रस्त्याचा अंदाज न आल्यानं पुराच्या पाण्यात गाई वाहून गेल्या...  title=

पालघर : पालघरमध्ये शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सूर्या नदीला पूर आला असून नदीनं रौद्र रुप धारण केलंय.. या पुरात पुलावरून चार गाई वाहून गेल्या आहेत. सूर्या नदीवरील पुल पाण्याखाली गेलाय. आणि या पुलावरून काही गाई पूल पार करत होत्या. मात्र पाण्याच्या वेगामुळे आणि पुलावरील रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे चार गाई पुरात वाहून गेल्या आहेत. हा संपूर्ण थरार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.  

पालघर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या आणि वैतरणा या प्रमुख नद्यांची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पालघर, बोईसर, साफळे, डहाणू, बोर्डी या भागातही जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय.