'बालकल्याण खातं मिळालं तेव्हा खुश नव्हते'

ग्रामविकास आणि महिला बालकल्याण खातं मिळाले तेव्हा आपण या खात्यावर खुश नव्हतो

Updated: Jun 24, 2018, 08:06 PM IST

बीड : ग्रामविकास आणि महिला बालकल्याण खातं मिळाले तेव्हा आपण या खात्यावर खुश नव्हतो, असा खुलासा स्वतः ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केला. मात्र आवडीचं खातं मिळालं नाही तरी आपण जे काम मिळालं ते प्रामाणिकपणे केले आणि खातं नावारूपाला आणल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक पद्दतीनं करण्याकरता पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये जाहीर सत्कार केला गेला. त्यावेळी त्यांनी आपलं मनोगत मांडलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बचाओ असा नारा द्यायला पाहिजे. मोदी आणि भाजपवर टीका करण्यापेक्षा राष्ट्रवादीनं स्वतःचा पक्ष बांधण्यावर लक्ष दिलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.