Happy Birthday : डेक्कन क्वीन @ 93, पुण्यात जल्लोष

Happy Birthday Deccan Queen : मुंबई आणि पुण्यामधील अंतर कमी करणारी डेक्कन क्वीनचा आज वाढदिवस. आज डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सुरु होऊन तब्बल 93 वर्षे पूर्ण झाली. 

Updated: Jun 1, 2022, 09:12 AM IST
Happy Birthday : डेक्कन क्वीन @ 93, पुण्यात जल्लोष  title=

पुणे : Happy Birthday Deccan Queen : मुंबई आणि पुण्यामधील अंतर कमी करणारी डेक्कन क्वीनचा आज वाढदिवस. आज डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सुरु होऊन तब्बल 93 वर्षे पूर्ण झाली. पुण्यात डेक्कन क्वीनचा वाढदिवस प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

पुणेकर प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन आज 93 वर्षांची झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. 1 जून 1930 रोजी ही गाडी पहिल्यांदा धावली होती. दैनंदिन प्रवास करणार्यांबरोबरच पुणे - मुंबई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत आवडीची आहे. 

या गाडीसोबत प्रवाशांच अनोखं नातं आहे. त्यामुळे 'डेक्कन क्विन'चा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज देखील पुण्यामध्ये डेक्कन क्वीनचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गाडी छान सजवण्यात आली होती. पुणे स्टेशनवरुन ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.