मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) संकटानंतर संकटावर संकट राज्यावर येत आहे. 'डेल्टा'नंतर आलेल्या 'डेल्टा वन' व्हायरसने (New Delta One Virus) आणखी चिंता वाढवली असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. 'डेल्टा वन'चा (Delta One Virus) संसर्ग वेगाने होतोय आणि 'लस'बाबतही ती कितपत प्रभावी आहे, याचा जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबत डॉ. अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली.
महाराष्ट्राची चिंता वाढली. राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21रुग्ण असल्याचे आधिच जाहीर करण्यात आले आहे. WHOने डेल्टा वेरियंटवर कोविड-19 लस प्रभावी ठरत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा व्हायरस किती प्रभावी असेल, हे आता स्पष्ट होत आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) म्हणते की कोविड -19 कोरोना विषाणूची लस डेल्टा व्हेरिएंटच्या विरूद्ध कमी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तथापि, ते मृत्यू आणि गंभीर आजाराच्या जोखमीपासून संरक्षण करू शकतात. डब्ल्यूएचओ एपिडेमिओलॉजिस्ट म्हणतात की एकाधिक व्हेरियंटमुळे कोरोना विषाणूविरूद्ध लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो.
त्यातच राज्यात याचे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे.
एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. 15 मेपासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत. आता राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा धाबे दणाणले आहेत.
राज्यात खतरनाक डेल्टा वन व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात नऊ आणि जळगावमध्ये सात रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत दोन आणि पालघर सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.