पुणे : मित्राचं लग्न असो...भावा-बहिणींचं लग्न असो...जवळच्या व्यक्तीच्या लग्नात आपण तुफान ठेका धरतो. असाच एक पुण्यातील तरूणाचा व्हिडीयो जवळपास गेल्या वर्षभरापूर्वी व्हायरल झाला होता. 'नाच रे मोरा' या गाण्यावर ठेका धरत नाचणाऱ्या तरूणाचा व्हिडीयो तुम्हाला आठवला असेलच.
मात्र आता या मोराचा डान्स करणाऱ्या तरूणाचं लग्न झालं आहे. इतकंच नव्हे तर स्वतःच्या लग्नात देखील या तरूणाला मोराचा डान्स करण्याचा मोह आवरलेला नाही. स्वतःच्याच लग्नात त्याने 'नाच रे मोरा' या गाण्यावर डान्स केला असून हा व्हिडीयो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या तरूणाचा पहिला व्हिडीयो साधारण एक ते दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा होता. अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या व्हॉट्स अपच्या स्टेटसला ठेवलेला. आता या तरूणाचं लग्न झालं. यातंही त्याने केलेला डान्स तुफान व्हायरल झालाय.
अनेकांनी या तरूणाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.