PHOTO : बारामतीच्या 'डॉटर'चे 'सेल्फी विथ खड्डे'!

शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढून वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध केलाय. 

Updated: Nov 1, 2017, 01:18 PM IST
PHOTO : बारामतीच्या 'डॉटर'चे 'सेल्फी विथ खड्डे'!  title=

पुणे : शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढून वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध केलाय. 

राज्यात खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी डेडलाईन दिली असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्याच्या ग्रामीण भागात खड्ड्यासोबत सेल्फी काढून अनोख्या पद्धतीने या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाट आणि कात्रज - उंडरी बायपासवरील खड्ड्यासोबत त्यांनी हे सेल्फी काढले आहेत. 

सुप्रिया सुळेंनी हे सेल्फी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना ते टॅग केले आहेत.