पिंपरी-चिंचवड: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा..

मोठ्या प्रमाणावर पोलिसफाटा आल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.

Updated: Jul 23, 2018, 01:58 PM IST

पिंपरी-चिंचवड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे...पण काही मराठा संघटनांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिलाय...त्यामुळे कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय...

कार्यकर्त्यांची धरपकड

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाऱ्या दिल्याच्या पार्श्वभूमिवर पोलिसानी मराठा संघटनांच्या कार्यकरत्यांची धरपकड सुरू केली आहे. सुमारे १० ते १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहराला छावनीचे स्वरूप

दरम्यान, कार्यक्रमावेळी कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलिस अलर्ट आहेत. संशायस्पत हालचाल दिसली तर पोलीस लगेच कसून तपास करत आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिसफाटा आल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.