शेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकारने पीक विम्याची व्याप्ती वाढवली

यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर ७० टक्के राहणार आहे. 

Updated: Jun 2, 2019, 12:57 PM IST
शेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकारने पीक विम्याची व्याप्ती वाढवली title=

मुंबई: शेतकऱ्यांना नेहमीच बदलत्या हवामानाचा फटका बसतो. त्यावेळी त्यांना पीवविम्याचा मोठा आधार मिळतो. परंतु, अनेकदा काही तांत्रिक अडचणी असल्याने पीकविमा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. 

मात्र, यंदा या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. कारण, केंद्र सरकारकडून यंदा पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी बदल करण्यात येणार आहेत. सरकारने पीक विमा योजनेच्या व्याप्तीत बदल करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर ७० टक्के राहणार आहे. 

ऑनलाइन अर्जासह विमा हप्ता भरण्यासाठी २४ जुलैपर्यंत मुदत आहे. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कारले, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा या तेरा प्रमुख पिकांसाठी योजना लागू असणार असेल. 

कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक तर बिगरकर्जधारक शेतकऱ्यांना ऐच्छीक असणार आहे. खातेदाराला किंवा त्याच्या मुलाला तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळेल.

वीमा योजनेचा लाभ सरळ आणि सोप्या पद्धतीने मिळावा, अशी माफक शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते. याचाही विचार केंद्र सरकारने केला आहे. हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न झाल्यास वीम्याचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी पेरणी न झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील जोखीम थोडी कमी होईल.