मोदी दुसऱ्याला खायला लावतात, मग त्याच्याकडून हिस्सा मागतात- प्रकाश आंबेडकर

लोकशाहीत राजेशाहीला थारा नसतो.

Updated: Oct 2, 2018, 06:29 PM IST
मोदी दुसऱ्याला खायला लावतात, मग त्याच्याकडून हिस्सा मागतात- प्रकाश आंबेडकर title=

औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: खात नाहीत. मात्र, ते दुसऱ्यांना खायला लावून नंतर त्यामधला हिस्सा मागतात, असा गंभीर आरोप भारिप बहुजन पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते मंगळवारी औरंगाबाद येथे भारिप आणि एमआयएम पक्षाच्या संयुक्त सभेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, भाजपचे नेते नेहमी आमचा पंतप्रधान स्वच्छ चारित्र्याचा असल्याचा दावा करतात. ही गोष्ट मी मान्य करतो. मात्र, मी एक सांगू इच्छितो की, पंतप्रधान मोदी हे स्वत: खात नाहीत. मात्र, ते इतरांना खायला लावून नंतर त्यामध्ये हिस्सा मागतात, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले. 

यावेळी त्यांनी भाजप सरकारला इशारा देताना म्हटले की, तुमचा सत्तेच्या परवान्याचे नुतनीकरण करायचे की नाही, हे जनतेच्या हातात आहे. शेतकऱ्यांना अनुदान किंवा कर्जमाफी देण्याची वेळ येते तेव्हा भाजपचे नेते स्वत:च्या खिशातून पैसे जात असल्यासारखे वागतात.
त्यांना आपण मालक आणि शेतकरी सालगडी आहेत, असे वाटते. परंतू, सालगडी असण्याचे दिवस आता संपले आहेत, हे भाजपच्या नेत्यांनी ध्यानात घ्यावे. अन्यथा जनता तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीत राजेशाहीला थारा नसतो. त्यामुळे राजसारखं वागायल बघू नका. अन्यथा आम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x