पुणेकरांसाठी खूशखबर, PMPL मधून १० रुपयात दिवसभर प्रवास

पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी नवी योजना

Updated: Feb 29, 2020, 01:10 PM IST
पुणेकरांसाठी खूशखबर, PMPL मधून १० रुपयात दिवसभर प्रवास

पुणे : पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी महापालिकेनं आणखी एक योजना आणली आहे. PMPL बस मध्ये दहा रुपयात दिवसभर प्रवासाचा पास मिळणार आहे. महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात त्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रदुषण, वाहतूक कोंडी, रस्त्यांचा अतिवापर यासारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात प्रवासासाठी महापालिकेने ही खास योजना आणली आहे. 

येत्या महिनाभरात ही योजना कार्यान्वित होईल असा महापालिकेचा दावा आहे. पुणेकर प्रवाशांकडून या योजनेच स्वागत होतं आहे. मात्र तिच्या अंमलबजावणी विषयी त्यांच्या मनात शंका आहे.

पुणे महापालिकेचा 2020- 21 चा अर्थसंकल्प सादर झाला. आर्थिक वर्षासाठी 7 हजार 390 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या निर्णयामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

पुणे शहरात अनेक भागात अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. 32 आसनक्षमता असलेल्या बसेस रस्त्यावर उतरणार आहेत. डेक्कन ते पुलगेट, स्वारगेट ते शिवाजीनगर, स्वारगेट- टिळक रस्ता- खजिना विहीर- अप्पा बळवंत चौक- पुणे स्टेशन मार्गे पुलगेट या मार्गावर ही सेवा सुरु होणार आहे.