'झी 24 तास'चा खास रिपोर्ट : पोलीस भरतीत मोठा घोटाळा उघड

 Police recruitment scam : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात पोलीस भरतीत मोठा घोटाळा उघड झाला आहे.  

Updated: Feb 10, 2022, 08:46 AM IST
'झी 24 तास'चा खास रिपोर्ट : पोलीस भरतीत मोठा घोटाळा उघड title=

प्रशांत अंकुशराव / मुंबई : Police recruitment scam : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात पोलीस भरतीत मोठा घोटाळा उघड झाला आहे. परीक्षा पास होण्यासाठी उमेदवारांनी चक्क 3 लाख रूपये मोजले आहेत. याबाबत 'झी 24 तास'ने छडा लावला आहे. (Police recruitment scam in Maharashtra)

राज्यात टीईटी घोटाळा, म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळा अशी घोटाळ्यांची मालिका सुरूच असतानाच आता आणखी एक भरती घोटाळा उघड झाला आहे. मुंबईतल्या पोलीस भरतीतलं मोठं गौडबंगाल 'झी 24 तास'च्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाले आहे. या घोटाळ्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. 

पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले आहे. पोलीस भरतीत बनावट उमेदवारांचा शिरकाव झाला आहे. तब्बल 3 लाख रुपये मोजून परीक्षेला डमी उमेदवार बसवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे पोलीस भरतीत पास होण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयेही मोजल्याचं समोर आले आहे.

डमी उमेदवारांमागे 'औरंगाबाद' कनेक्शन असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. उत्तम धावपटूचा बनावट उमेदवार म्हणून सहभाग असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात आणखी 42 जण संशयाच्या भोवऱ्यात आहेत.