शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Updated: Apr 13, 2023, 01:07 PM IST
शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट title=

Aaditya Thackeray On Eknath Shinde : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर बंड केलेल्या शिंदे यांनी सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला. आता मोठा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे हे 'मातोश्री'वर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हैदराबादच्या गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात आदित्य ठाकरे यांनी बंडाआधी 'मातोश्री'वर नेमकं काय घडलं ते सांगितलं. भाजपसोबत गेलो नाही तर मला तुरुंगात टाकतील, असे एकनाथ शिंदे यांनी मातोश्री निवासस्थानी येऊन सांगितले. त्यावेळी ते रडले होते, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले?

शिवसेनेत बंड झाले आणि शिवसेना उभी फुटली. पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे दिले गेले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले, याबाबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत जवळपास आठ महिन्यांपूर्वी मोठी फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी बंड का केले, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे हे 'मातोश्री'वर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रातील राजकारण, पर्यावरण, शिवसेनेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी आदित्य यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले की,  एकनाथ शिंदे यांनी तुरुंगात जाण्याच्या भीतीने बंड केले आहे. भाजपसोबत गेलो नाहीतर मी तुरुंगात असेन, असे त्यांनी म्हटले. 

शिंदे गटातील संबंधित 40 आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तिकडे जाण्याचे दुसरं कोणतेही कारण नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री 'मातोश्री'वर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असे ते त्यावेळी म्हणाले होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे.